ब्राम्ह मूहूर्तावर निघायचे ठरवले होते कारण ’लांबचा पल्ला...काय होईल... कस्स होईल...’! त्यात आधीच मित्रांनी रस्त्याची केलेली रंजक वर्णनं आणि शंका! सरळ जाणार रस्ता बंद नसता तर प्रवासाचे अंतर अवघ्या ४० मिनीटात पार करता आले असते त्याला आता चांगलाच वेळ लागणार होता. आधी उत्तरेला १०० किमी मग पूर्वेला १६० किमी, दक्षीणेला ८० किमी आणि आणि शेवटच्या टप्प्यात पश्चिमेला ६० किमी असा प्रवास होता. काहि सामान त्याच दिवशी पोचवायचे असल्याने हा सगळा हा द्राविडी प्राणायाम! माझ्या उत्सुकतेला बरीच कारणे होती; उत्तर - दक्षीण पसरलेल्या लांबलचक नॅशनल फॉरेस्टची एक छोटी प्रदक्षिणा, त्यासाठीचे वाहन कारण जातानाचा प्रवास होता चक्क ट्रकमधून आणि येताना ट्रेन!
जरी थोडा उशीर झाला असला तरी हवेतील थंडावा जाणवत होता! अर्ध्या तासाच्या आतच वाहन अगदी सराईतपणे चालवलं जात आहे असं वाटल्याने नव्या वाहनाची, वळणदार रस्त्याची काळजी जाऊन हळूहळू सभोवतालाची जाणीव होऊ लागली. डाव्या बाजूला अगदी शांत वाटणार्या समुद्रावर मच्छीमारांच्या होडक्यांचे दिवे मात्र हेलकावे खाताना दिसत होते. रस्त्याच्या दुसर्याकडेला थोडी थोडी शेतं हि असल्यासारखी वाटत होती. खुरट्या झाडीतून एखादा काजवाहि चमकत होता. मध्येच कधीतर डोंगर रांगांच्या घळीतून समुद्राच्या दिशेने जाणार्या वार्याचा भसकन हल्ला झाला की मात्र वाहनावरचा सराईतपणा गळून पडल्यासारखा वाटे! एक छोटा बोगदा पार केल्यानंतर मात्र वार्याचे छुपे हल्ले बंद झाले.
आता आमाचा समुद्राकडे पाठकरून सूर्याच्या दिशेने प्रवास चालू झाला होतो. नॅशनल फॉरेस्टच्या मधून जाणारा हा रस्ता एक पदरीच होता. थोड्याच वेळात लहान लहान आकाराची टेकाडं दिसू लागली होती. समुद्राच्या वाळूतले छोटे छोटे किल्लेच! महाकाय कासवांच्या पाठीसारखे त्यांचे आकार होते. जवळ असूनसुध्दा टेकाडांचा माथा आणि पायथा एकाच नजरेत समावत होता तर त्यांच्या मागच्या डोंगरांची उंची इतकी की ढगांनी झाकल्यामुळे त्यांचा माथाहि दिसत नव्हता. काहि काहि टेकाडांच्या पश्चिमेचा भाग माथ्यावरच्या एकाच झाडाच्या सावलीत झाकला जात होता. तिथेच थांबून दोन चार टेकाडांना सहज प्रदक्षिणा घालून चढून जावं अस वाटू लागलं. दूर कुठे कुठे घिरट्या घालणारे शिकारी पक्षी आणि रस्त्याच्या कडेला गाडीची ठोकर लागून मरून पडलेला एखादा कोल्हा एवढीच काय ती नॅशनल फॉरेस्टची निशाणी!
दक्षिणेकडचा बराचसा प्रवास घाटमाथ्यावरूनच झाला. खोल दरीत मोठी मोठी तळी आणि त्यांचे बांधारे दिसत होते. ह्या तळ्यांमुळेच झालेल्या नदीने मग आम्हाला आमच्या पश्चिमेकडील प्रवासात साथ दिली ती अगदी आमच्या गावापर्यंत. आम्हि गावात शिरताना शेवटचे एक दर्शन देऊन ती गेली समुद्राकडे!
परतीला रात्रीची गाडी पकडून आम्हि परत आमच्या ठिकाणी पोचलो आणि वाटलं की खरोखरीच एक मोठा प्रवास संपला!
प्रवासाचा शीण झटकून सकाळी उठून सगळं उरकेपर्यंत बातमी आली कि रस्ता दुपारी एक वाजता सुरू होणार आहे! मित्रांना काय, उलट-सुलट केलेल्या प्रवासाच्या कौतुकाचे रुपांतर ह्या बातमीने लगेच चेष्टेत झालं!

No comments:
Post a Comment