Saturday, January 1, 2011

बस (ती) गाणी


काल ac बस मध्ये चढलो. बरीच भरलेली होती. conductor सगळ्याना थोडे थोडे पुढे सरकून घ्यायला सांगत होता. पण लोक ऐकतील तर ना!
मी जरा गर्दीतून वाट काढत काढत थोडा settle होण्याचा प्रयत्न करत होतो. थोडे सेटल झाल्यावर जरा आजूबाजूला काय चालले आहे, बसचे वातावरण जरा जाणवायला लागले. तेवढ्यात बसमधल्या टीव्हीवर एका शीतपेयाची जाहिरात लागली. ह्या जाहिरातीत मी तरी कधी मुलींना पाहिलेलं नाहि. ह्या कंपनीने मुलींना न घेऊन / दाखवून त्यांचा गौरवच केला आहे. त्यांना कदाचित असं दाखवयच असेल की मुलींना ’डर’ नसतोच! त्या जाहिरातीतील शेवटची ओळ ऐकली आणि बस मध्ये उभ्या उभ्या वाटले की "मुझे ये पता है की...डर के आगे जीत है...और दादर के आगे सीट!"

जाहिरातींनंतर हिंदी गाणी चालू झाली. पहिल्यांदा कानावर गाणे नुसतेच पडत होते, मग हळू हळू ऐकायला लागलो. पहिलेच गाणे जे ऐकले ते "अगर तुम मिल जाओ जमाना छोड देंगे हम...." मनात विचार आला असे कोणी करते का? माझ्या मनात "अगर तुम उठ जाओ खडा रहना छोड देंगे हम..." हाच विचार.

त्यानंतर थोड्या वेळाने आणखी एक गाणे..."जब से तेरे नैना मेरे नैनो से लागे रे..." त्यात एक ओळ अशी आहे (खरेतर मलाही आता आश्चर्य वाटते आहे की मी एवढे लक्ष देऊन गाणी कशी ऐकली!) "जाब से मिला है तेरा इशारा...हो रही हैं बेचैनिया..." आणि माझ्या मनातला विचार अगदी सोपा होता...त्या पर्सची जेंव्हापासून हालचाल चालू केलीस तेंव्हापासून तू कधी उतरणार ह्याची बेचैनीने मी वात बघत आहे!

पुढचे गाणी होते "आंखो मी तेरी अजब अजब सी अदाये है..." त्यात एक ओळ अशी आहे "दिल को बना दे पतंग सांसे ये तेरी हवाये है..." आणि मी विचार केला की जर का बाजूच्या माणसाने रात्री थोडी कमी घेतली असती आणि सकाळी जर नीट ब्रश केला असता तर....

आणि तेवढ्यात नजर समोरच्या रोलिंग डिस्प्लेवर गेली...
"बेस्ट बस मध्ये आपले स्वागत आहे..."