निघालो तर जोरदार थंडी होती. मी लांब बाह्यांच्या टी-शर्टवर स्वेटर, जॅकेट आणि कानटोपी घातली होती. इथे तरी हे कपडे कामाला आले असा विचार करत मी गाडीत बसलो.
गाडी थोडी पुढे आल्यावर गाडीच्या दिव्याच्या उजेडात रंगीबेरंगी स्वेटर घालून पहिल्या बसने ३० किमी लांब असलेल्या हायस्कूल - कॉलेजला जाणारी मुले दिसली. तोंडातून वाफा बाहेर काढत हातावर हात घासत थंडीला पळवायचा प्रयत्न करत होती. मांडीखाली घातलेल्या माझ्या हाताची घडी घातली गेली.
नदीवरच्या पुलाच्या अलिकडे अर्ध्या बाह्यांचे स्वेटर घातलेल्या काहि बाया डोक्यावर आणि काखेत कळशा घेऊन चालताना दिसल्या. गाडीने पूल ओलांडेपर्यंत माझी कानटोपी सीटवर पडली.
हायवेला लागल्यावर आमच्या नेहमीच्या चहाच्या टपरीच्या आधी दगडफोड्याचे एक कुटुंब दगड फोडण्याचे काम करत होते. त्याच्या अंगात साधी बंडी आणि त्याच्या बायकोच्या अंगावर साडी! चहाला खाली उतरण्याआधी माझे जॅकेट सीटवर पडले.
चहावाल्याला भाऊंनी "तीन चहा घे रे आणि दोन चहा पाव त्या दगडफोड्याला देऊन ये" असं सांगत माझ्याकडे बघून हसत म्हणाले "काय, आता तरी थंडीची बोच कमी होईल ना?"