माझ्या एका बहिणीने कर्नाटकातील एका जंगलातून फिरून आल्यावर मला छान वर्णन लिहून कळवले. पण एकही पक्षी ओळखता न आल्याबद्दल तिला वाईट वाटत होते. म्हणून तिला मी हे उत्तर दिले...
तो आवाज, ते रूप, ती लकब दाखवून तो गेला
मीच बसले शोधत त्याचे नाव गाव पत्ता!
मग कळले, नाव सांगायला तो आलाच नव्हता
जे द्यायचे होते ते देऊन तो गेला!
पण आलाच जर परत तर नक्की ओळखेन,
मी त्याला आणि तो मला!
Yes I like it
ReplyDelete