माझ्या चुलत भावाला त्याच्या पहिलीतल्या मुलीची सध्या खूप काळजी वाटत आहे. तशी ती मुलगी आनंदी, चुणचुणीत आहे पण मध्येच कधीतरी वेगळ्याच विश्वात गेल्यासारखी वावरते, न दिसणार्या लोकांशी, वस्तूंशी गप्पा मारत बसते, ते ही कित्येक वेळ! तिला हलवून परत आणावे लागते इतकी ती तिच्या विश्वात रमते!
शाळेतून ही तक्रारी आल्या. डॉक्टरांनी मानोसपचार तज्ञांकडे घेऊन जायला सुचवले आणि माझा चुलत भाऊ व्याकूळ झाला.
डॉक्टरांकडून घरी परत येताना त्याला देऊळ दिसले म्हणून तो आत गेला! त्याने मागितले काही नाही पण मन शांत करून आला....न दिसणार्या देवापाशी!