गावात आलेल्या अनोळखी गाडीची बातमी अख्या गावाला लगेचच कळावी असे जेमतेम पाचशे घरांचे घाट माथ्यावरचे दुष्काळी गाव. पुढे पठार, कोरड्या दर्या आणि ओसाड डोंगरांच्या रांगा. पण ह्या वर्षी पावसाने अचूक वेळ साधत जमिनीत दडून बसलेल्या जंगली झाडांच्या बियांना भोज्जा करून कोंब फुटवले. तो बाण डोंगर उतारावर असा लागला होता की पुढील दोन महिन्यात अख्खा डोंगर उतार इंद्रधनुषी होऊन गेला. गावाने ही कधी न पाहिलेली रंग बरसात दर्यांमधून दिसू लागली. जिल्ह्याच्या वर्तमानपत्रात बातमी ही झळकून गेली. एक दोन दिवस त्याची चर्चा करून गाव परत आपल्या कामात गुंतला.
आज सकाळपासून प्रत्येक गाडीवान मोबाईलवरचा फोटो दाखवत रस्त्याकडेच्या घरातल्या माणसांना दिशा विचारत विचारत दरीकडे गेले. गावकर्यांना ही जरा अप्रूप वाटलं. दोन पाच उत्साही मुले गाड्यांना रस्ता दाखवायला सायकल दौडवत गेले. आज अख्या दिवसात पंचवीस तीस गाड्या गावात येऊन गेल्या. पुढे एक दोन दिवस गाड्यांची संख्या वाढत गेली.
शनिवारी सकाळी गाव जागा झाला तो गाड्यांच्या आवाजानेच! दुपार पर्यंत तर गावातल्या प्रत्येक रस्यावर गाड्या उभ्या केलेल्या दिसू लागल्या. तरी ही येणार्यांची संख्या कमी होत नव्हती. मारूतीच्या शेपटासारखी गाड्यांची लांबच लांब रांग डोंगरावरून दिसत होती. गावकर्यांना घराबाहेर पडणं अवघड झाले. त्यांना तर त्यांचे सर्व व्यवहार ठप्प झाल्यासारखे झाले. एवढी गर्दी हाताळायला गावातील पोलिस ही तयारीचे नव्हते. गावात हॉटेल तर सोडाच चहा-पाण्याची सोय नव्हती.
तिथे पठारावर आणि दरीवर तर क्रिकेट मॅचला गर्दी जमावी तेवढी गर्दी! जिथे जाणं ही अवघड अशा ठिकाणी निसर्गप्रेमी चक्क बसकण मारून घसरत घसरत, असंख्य फुले चिरडत आपल्या फोटोत दुसरा कोणी येऊ नये म्हणून आणखी चांगल्या जागा शोधत होते. गाड्यांच्या टायरखाली पठारावरील किती फुले चिरडली गेली ह्याची तर गणतीच नव्हती. छान एकांतात फुललेला निसर्ग गर्दी बघून आकसून गेला.
सोमवारी पेपरात आलेला गर्दीचा आकडा बघून गावकरी चक्रावले. लवकरच गावाची एक सभा बोलावली गेली. कारण पुढील काही अठवड्यात काय होईल ह्याची गावकर्यांना भितीच वाटू लागली. सभेसाठी पोलिस आणि वन विभागाच्या अधिकार्यांना ही बोलावले गेले. गेल्या अठवड्याभरात स्थानिक पोलिसांचा, गावकर्यांचा एकंदरीत कसा गोंधळ उडाला हे मांडण्यात आले. सभे नंतर सर्वांनी एक फेरफटका मारून परिस्थितीचा अंदाज घेतला. सभेत ठरवल्याप्रमाणे पोलिस आणि वन विभागाच्या संकेत स्थळावरून, सोशल मिडीयावरून जिल्ह्याच्या वर्तमानपत्रातून पर्यटकांना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. वेशीवर, पठारावर ही तसे फलक लावण्यात आले. अठवडाभर असलेली ’तुरळक’ गर्दी हाताळत गावचा निसर्ग वाचवण्यासाठी शनिवार रविवारच्या मोठ्या लढाईला गाव तयार झाला.
शनिवार दुपारच्या आतच गर्दी हाताळण्यासाठी केलेली मोर्चे बांधणी पूर्णपणे कोलमडली. मागच्या वेळपेक्षा तिपटीने पर्यटक आले. उभे केलेले काही फलक आता फुलांबरोबर गप्पा मारत होते! वहानांची संख्या इतकी वाढली की हायवेवरून गावाकडे येणारा रस्ता बंद करावा लागला. निसर्गविधीसाठी केलेली सोय ही कोलमडली आणि अचानक एका दूरच्या पठारावर वावटळच उठली. रस्ता बंद करता काय...मग आम्ही हेलिकॉप्टरनेच येतो! गर्दीपासून दूर असलेल्या एक जोडपे खरोखरच हेलिकॉप्टरने उतरले. त्यांच्यावर काय कारवाई करता येईल ह्याचा विचार अधिकारी अजून करत आहेत!
एकंदरीतच सातार्याजवळचे कास असू द्या नाही तर कॅलिफोर्नियातील लेक एल्सिनोर - वॉकर कॅनियन..किंवा आणखी कुठले गाव...निसर्गप्रेमींना तोड नाही!
लेक एल्सिनोर - वॉकर कॅनियन बातमीसाठी