बागेतून फिरताना एकदम आवाज आला "तिकडे जाऊ नकोस, पडशील". नेहमी प्रमाणे एक पालक आपल्या मुलाला अनावश्यक भीती दाखवत होते. मुलगा खेळ थांबवण्याचे चिह्न दिसत नव्हते. मनात आले चला मुलगा तरी हुशार आहे. परत थोड्यावेळाने पालक ओरडले , "तिकडे जाऊ नकोस, काळा साप येइल". खरोखरी ह्यांना जे बोलत आहेत ते व्हायला हवे आहे का? थोड्या वेळानंतर नविनच शास्त्र उगाराले गेले, "आता, तुला कोणीतरी उचलून घेउन जाईल". मनात शंका आली, ह्या दोघात नक्की लहान कोण?
थोडे पुढे, झोपाळयावर एक बाई एक-दिड वर्षाच्या मुलाला मांडीवर घेउन छान झोके घेत होत्या. खरे तर एक-दिड वर्षाचे मूल एकटे नक्कीच बसू शकते. मी पुढे जून त्यांना झोपाळा तुटू शकण्याची सूचना दिली. वर झोपाळा तुटला तर म्युन्सिपाल्टीच्या कृपेने कधीही दुरुस्त होणार नाही हे ही सांगितले. झाले मी एक नविन शत्रुच निर्माण करुन घेतला होता! बाई माझ्यावर इतक्या चिडल्या की परत माझ्या मनात शंका आली, ह्या दोघात ....
परतिच्या वाटेवर दोन मुले पालकांच्या अवति-भोवति खेळत होती. पालकांची चर्चा कानावर पडली "काय हा पोर्शन, कुठून चालू करावे हेच समजत नाही"... आणि परत माझ्या मनात शंका आली, ह्या दोघात ....
Tuesday, September 29, 2009
Subscribe to:
Posts (Atom)